आरती संग्रह
सर्व देवता

घालीन लोटांगण

18px
घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रूप तुझें । प्रेमें आलिंगन आनंदें पूजिन । भावें ओवाळीन म्हणे नामा ॥१॥ त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥ कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयामि ॥३॥ अच्युतं केशवं रामनारायणं । कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् । श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं । जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥ हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥५॥

फायदे

ही प्रार्थना प्रत्येक आरतीनंतर महाराष्ट्रात म्हटली जाते. यामुळे भक्तिभाव वाढतो, मनाला शांती मिळते आणि ईश्वराला संपूर्ण समर्पणाची भावना निर्माण होते. सर्व कर्मे भगवंताला अर्पण केल्याने कर्मबंधन तुटते.
#universal#aarti#closing-prayer#namdeva#daily#maharashtra#ghalin-lotangan