आरती संग्रह
गणेश

श्री गणपती आरती

18px
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती । जय देव जय देव ॥धृ॥ रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥२॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती । जय देव जय देव ॥धृ॥ लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥३॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती । जय देव जय देव ॥धृ॥

फायदे

गणपती आरतीचे नियमित पठण केल्याने विघ्ने दूर होतात, मनःशांती लाभते, कार्यसिद्धी होते आणि बुद्धी तीक्ष्ण होते. प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी ही आरती म्हणावी.
#ganesh#aarti#daily#ganpati#sukhkarta