आरती संग्रह
देवी

श्री देवी आरती

18px
दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी । अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी । वारी वारी जन्ममरणाते वारी । हरी हरी पदी तारी हे वेंकटे श्री ॥१॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥धृ॥ त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही । साहित्य सामर्थ्य न चले कवणाचे काही । दास रामाचा वाट पाहे लवलाही ॥२॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥धृ॥ प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशखंडणी जनमोदिनी परमरूप पिसा । अंबे तुज भजताम भवभय पैसा । दास रामाचा नेणे गुणमहिमा कैसा ॥३॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥धृ॥

फायदे

देवी आरती नियमित म्हणल्याने शत्रूंवर विजय मिळतो, भवभयाचा नाश होतो, आणि दुर्गा मातेची कृपा प्राप्त होते. नवरात्रीत विशेष फलदायी.
#devi#durga#aarti#navratri#mahishasurmardini