आरती संग्रह
दत्तात्रेय

श्री दत्तात्रेय आरती

18px
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा । त्रिगुणी ज्याचे रूप जाणे तो शहाणा । जय देव जय देव जय श्रीदत्ता ॥१॥ जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता । आरती ओवाळू तुज सद्गुरुदत्ता । जय देव जय देव ॥धृ॥ सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्ता । अभाग्यासी कैची कळे ही मात । परमार्थीचा पंथ नेणती बहुत । जय देव जय देव जय श्रीदत्ता ॥२॥ जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता । आरती ओवाळू तुज सद्गुरुदत्ता । जय देव जय देव ॥धृ॥ षडदर्शनस्थापना करावयासी । अनसूयागर्भी जन्मला एक होसी । तत्त्वतो सारा ब्रह्मांडगोळ तूची । जय देव जय देव जय श्रीदत्ता ॥३॥ जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता । आरती ओवाळू तुज सद्गुरुदत्ता । जय देव जय देव ॥धृ॥ भक्तजनांसी तारावयासी । तूचि एक दत्ता शरणागता पाशी । दास रामाचा अभिळाष जयासी । जय देव जय देव जय श्रीदत्ता ॥४॥ जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता । आरती ओवाळू तुज सद्गुरुदत्ता । जय देव जय देव ॥धृ॥

लाभ

दत्त आरती पठणाने गुरुकृपा प्राप्त होते, अध्यात्मिक प्रगती होते, भूत-प्रेत-पिशाच्च बाधा दूर होतात, आणि मानसिक शांती लाभते. गुरुवारी विशेष फलदायी.
#dattatreya#datta#aarti#guru#trimurti