Aarti Collection
Vitthal

Shri Vitthal Aarti

18px
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा । जय देव जय देव ॥धृ॥ तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी । कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥२॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा । जय देव जय देव ॥धृ॥ धन्य वेणूनाद अनुक्षण ऐकू । सुवर्णाची कमळे राईसंगे देखू । हर्षे निटिले लोचन कान्होबाचे मुख । दास रामाचा वाट पाहे सुख ॥३॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा । जय देव जय देव ॥धृ॥

Benefits

Regular recitation of Vitthal Aarti enhances devotion, washes away sins, and brings inner peace, especially for devotees of the Warkari tradition. Particularly beneficial on Ekadashi.
#vitthal#panduranga#aarti#warkari#pandharpur