Aarti Collection
Shankar

Shri Shankar Aarti

18px
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा । लावण्यसुंदर मस्तकी बाळा । तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा । जय देव जय देव ॥धृ॥ कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥२॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा । जय देव जय देव ॥धृ॥ देवी दैत्यी सागर मंथन पै केले । त्यामाजी अवचित हळाहळ उठले । ते त्वां असुरपणे प्राशन केले । नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा । जय देव जय देव ॥धृ॥ व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी । शतकोटीचे बीज वाचे उच्चारी । रघुकुळटिळक रामदासी अंतरी ॥४॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा । जय देव जय देव ॥धृ॥

Benefits

Reciting Shankar Aarti removes all fears, washes away sins, brings Shiva's grace, and paves the path to liberation. Especially beneficial on Mondays and Mahashivratri.
#shiv#shankar#aarti#daily#mahadev